
Instagram Down : सकाळी सकाळी इंस्टाग्राम डाउन, रिफ्रेश अन् लॉग इनबाबत यूजर्सच्या हजारो तक्रारी
Instagram Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम सकाळपासून डाऊन असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. असे सांगण्यात येत आहे की जगभरातील यूजर्सना इन्स्टाग्राम वापरण्यात समस्या येत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्स क्रॅश किंवा डाउन होण्याच्या घटनांचा मागोवा घेणारी वेबसाइट डाऊन डिटेक्टरच्या मते, आज सकाळपासून यूजर्सना इंस्टाग्राम स्क्रोल करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
Downdetector च्या मते, 27,000 हून अधिक यूजर्सनी Instagram वर कंम्पेंट्स रजिस्टर केल्या आहेत.
रिपोर्ट्सनुसार, सकाळी 7 च्या सुमारास यूजर्सना अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यावेळी यूजर्सच्या रिपोर्ट्समध्ये वाढ झाली. यापैकी 50 टक्के युजर्सनी सर्व्हर कनेक्शनबाबत तक्रार केली आहे, तर 20 टक्के लोकांनी लॉगिनमध्ये समस्या असल्याचं म्हटलं आहे. इंस्टाग्राममध्ये समस्या आल्यानंतर यूजर्स ट्विटरवर याची पुष्टी करत आहेत. अनेक लोक याच्याशी संबंधित मीम्स शेअर करत आहेत तर अनेक लोक याबाबत ट्विटर पोस्ट टाकत आहेत.
Downdetector ने नमूद केले आहे की यूके मधून 2000 हून अधिक अहवाल आले आहेत. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलियातील प्रत्येकी एक हजाराहून अधिक लोकांनी याबाबत आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, आतापर्यंत ही माहिती इंस्टाग्रामकडून अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.
यापूर्वी जेव्हा नोव्हेंबर आणि सप्टेंबरमध्ये इंस्टाग्राम डाऊन होते तेव्हा इन्स्टाग्राम डॉटकॉमद्वारे यासंबंधित माहिती पुढे आली होती आणि समस्या दूर झाल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली जात होती.
याआधीही इंस्ट्राग्राम बरेच वेळा डाउन झाले. कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन होताच लगेच यूजर्सच्या ट्विट्स आणि मीम्स पोस्टींगला सुरुवात होते. सकाळपासून यूजर्सना इंस्टाग्राम रिफ्रेश करण्यातसुद्धा अडचणी येताय.