अपुऱ्या झोपेमुळे तरुणांना जडतोय 'हा' आजार

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

महाविद्यालयीन युवक आणि खेळाडूंना कायम अपुरी झोपेची सवय असते, पण आता ही सवय आजाराचे कारण बनत आहे. 

सॅन अँटोनिओ : महाविद्यालयीन युवक आणि खेळाडूंना कायम अपुरी झोपेची सवय असते, पण आता ही सवय आजाराचे कारण बनत आहे. 

अमेरिकेतील स्लिप रिसर्च सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की दिवसभर धावपळ केल्याने शरीर दमते आणि त्याला पुरेसा आराम मिळणे गरजेचे असते. तरुणांचे दिवसभर महाविद्यालय, ऑफिस, घर हे रुटीन चालू असते आणि त्यानंतर रात्रीची शांत झोप तुमचा दिवसभराचा ताण दूर करते. पण रात्री पुरेशी झोप मिळाली नाही. तर, सतत काम आणि तणाव असणाऱ्या तरुणांनी पुरेशी झोप न घेतल्यास त्यांना आरोग्याशी निगडीत अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये सर्वाधिक धोका आहे तो नैराश्याचा आणि मानसिक स्वास्थ बिघडण्याचा.  

अपुऱ्या झोपेमुळे तरुणांमध्ये नैराश्य, आत्महत्येचा किंवा स्वत:ला त्रास करून घेण्याचा विचार यांचे प्रमाण वाढते. असा विचार मनात येणं किंवा त्यांचं प्रमाण वाढणे हे धोकादायक आहे. अर्धवट झोपेचा थेट संबंध आहे तो मानसिक आरोग्याशी. परिणामी तरुणांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचा विचार येण्यास सुरुवात होते. या अभ्यासात जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insufficient sleep linked to mental health in college students and athletes