कृपण बाळगल्याबद्दल अमेरिकेत एकाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

वॉशिंग्टन - कृपण बाळगल्याबद्दल अमेरिकेत एका शीख नागरिकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील मेरिलॅंडमधील कॅटोन्सव्हिला येथे मागील आठवड्यात एका स्टोअरमधील ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केल्याचे हरप्रितसिंग खालसा यांनी सांगितले.

मूळचे जस्टिन स्मिथ असलेल्या खालसा यांनी नऊ वर्षांपूर्वी शीख धर्म स्वीकारला होता. तेव्हापासून ते स्वतःजवळ कृपण बाळगतात; मात्र कृपण बाळगल्याबद्दल पोलिसांनी यापूर्वीही खालसा यांना अनेकदा अटक केली होती. मागील आठवड्यात पोलिसांनी खालसा यांना अटक केली होती; मात्र कृपण बाळगणे ही धार्मिक बाब असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी खालसा यांना सोडून दिले होते.

Web Title: international news marathi news sakal news crime