नवे शीतयुद्ध न परवडणारे - अँटोनिओ गुटेरेस

अँटोनिओ गुटेरेस यांचे अमेरिका-चीनला आवाहन
अँटोनिओ गुटेरेस
अँटोनिओ गुटेरेसsakal

न्यूयॉर्क : ‘अमेरिका आणि चीन यांनी त्यांच्यातील पूर्णपणे विकोपाला गेलेले राजनैतिक संबंध सुधारत संभाव्य नवे शीत युद्ध टाळावे,’ असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी आज या दोन बड्या देशांना दिला. या दोन शक्तीशाली देशांमधील वादाचे पडसाद जगामध्ये इतरत्र उमटण्याआधीच वाद मिटवावा, हे युद्ध परवडणारे नाही, असे आवाहन गुटेरेस यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग, पर्यावरणाची वाढती समस्या आणि जगभरात विविध ठिकाणी सुरु असलेले संघर्ष या पार्श्वभूमीवर होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या आधी गुटेरेस यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून सर्व देशांशी संवाद साधला. ‘‘अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या आर्थिक शक्तींनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच त्यांनी मानवाधिकार, ऑनलाइन सुरक्षा आणि प्रदेशांची स्वायत्तता हे मुद्दे लक्षात ठेवत व्यापार आणि तंत्रज्ञान या विषयांवर अधिक गांभीर्याने चर्चा करणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने सध्या आपण फक्त तणाव पहात आहोत. या दोन शक्तींमधील संबंध पुन्हा सुरळीत होणे आवश्‍यक आहे.

अँटोनिओ गुटेरेस
वाळुंज ग्रामस्थांना मिळाली प्रॉपर्टीची सनद , राज्यात पहिलाच उपक्रम

अफगाणबाबत चिंता

गुटेरेस म्हणाले की, ‘अमेरिकेसह अनेक देशांनी हजारो अब्ज डॉलर खर्च करूनही त्यांना येथील समस्या सोडविता आली नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी अचानक तेथे सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यास मदत करावी, मानवाधिकारांची हमी द्यावी.’

शीत युद्ध नव्हे; स्पर्धा

अँटोनिओ गुटेरेस यांच्या विधानाचा अमेरिकेने इन्कार केला आहे. ‘अमेरिका-चीन यांच्यातील संबंधांचा गुटेरेस यांनी लावलेला अर्थ आम्हाला मान्य नाही. चीनबरोबरील आमचे संबंध हे संघर्षाचे नसून स्पर्धेचे आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायादरम्यान, विशेषत: जागतिक शक्ती असलेल्या देशांमधील चांगल्या संबंधांशिवाय पर्यावरण बदल, लसीकरण आणि इतर अनेक आव्हानांचा सामना करता येणे शक्य नाही.

- अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस, यूएन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com