इराणची ५२ ठिकाणं रडारवर

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जानेवारी 2020

इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार मारल्यानंतर आखाती देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे इराणने अमेरिकेचा बदला घेण्याची घोषणा केली असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला कठोर प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. इराणमधील हल्ल्यासाठीची संभाव्य ५२ ठिकाणं निश्‍चित करण्यात आली असून, या ठिकाणांवर पूर्वीपेक्षा अधिक कठोर प्रहार करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन - इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार मारल्यानंतर आखाती देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे इराणने अमेरिकेचा बदला घेण्याची घोषणा केली असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला कठोर प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. इराणमधील हल्ल्यासाठीची संभाव्य ५२ ठिकाणं निश्‍चित करण्यात आली असून, या ठिकाणांवर पूर्वीपेक्षा अधिक कठोर प्रहार करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इराणच्या सैनिकांनी अमेरिकी लष्करी कर्मचारी अथवा मालमत्तेवर हल्ले केले तर आम्ही इराणमधील ५२ ठिकाणांना लक्ष्य करू, असा इशारा देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘‘या सर्वच स्थळांना इराणमध्ये मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. सुलेमानीला ठार मारल्यानंतर इराणने बदल्याची धाडसी भाषा सुरू केली आहे. निष्पाप अमेरिकींना ठार मारणाऱ्या सुलेमानीने याआधीही आमच्या दूतावासावर हल्ले केले आहेत. आमच्या अन्य ठाण्यांना लक्ष्य करण्याचा त्याचा इरादा होता. इराणकडे प्रश्‍न वगळता काही शिल्लक राहिलेले नाही. इराणने बदल्याची भाषा करू नये, आम्ही आणखी धमक्‍या सहन करणार नाही.’

अमेरिकेच्या तळावर इराकमध्ये हल्ला 

ट्रम्प यांनी इराणला दोनदा कारवाईचा इशारा दिल्याने तणाव आणखी वाढला आहे. ट्रम्प यांनी रविवारी मध्यरात्री ट्‌विट करताना इराणला पूर्वीपेक्षा अधिक सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. ‘‘अमेरिकेने आता लष्करी साधनांवर दोन ट्रिलियन डॉलर खर्च केले आहेत. जगातील आमची लष्करी ताकद ही मोठी असून, आम्हीच सर्वोत्कृष्ट आहोत. इराणने आमच्या ठाण्यांवर हल्ले केल्यास आम्ही पुन्हा काही सुंदर लष्करी साधने त्यांच्याकडे पाठवू. हे करताना आम्ही थोडेही कचरणार नाही,’’ असे ट्रम्प यांनी दुसऱ्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran 52 places on radar donald trump