इराणबरोबरचा करार अनेक वर्षांचा परिणाम : ओबामा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : इराणबरोबरच्या अणुकराराला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी हा करार महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

जागतिक समूहाचा पाठिंबा लाभलेला हा करार रद्द करू नये, अशीही अपेक्षा व्यक्त केली अहे. हा करार अनेक वर्षांचा परिणाम आहे, हे अमेरिकेने कायम लक्षात ठेवायला हवे. हा करार केवळ अमेरिका आणि इराणचा नाही, तर जगातील बड्या शक्तीदरम्यान झालेल्या कराराचे प्रतिनिधित्त्व करत आहे, अशा शब्दांत ओबामा यांनी अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला.

ओबामा म्हणाले की, अमेरिका आणि जगाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेला करार हा महत्त्वाचा आणि ठोस परिणामाचा परिपाक आहे. हा करार इराणाला अणुखरेदी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पुरेसा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी म्हटले होते की, मी इराण करारापासून समाधानी नाही आणि माझ्या मते आतापर्यंतचा सर्वाधिक खराब करारापैकी हा एक करार आहे.

Web Title: iran agreement results in many years: Obama

टॅग्स