भूकंपाच्या धक्क्यानं इराण हादरलं; 5.0 रिश्टर स्केलची तीव्रता

Earthquake in Iran
Earthquake in Iranesakal
Summary

इराणच्या पश्चिम भागात बुधवारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत.

Earthquake in Iran : इराणच्या पश्चिम भागात बुधवारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.0 इतकी मोजली गेलीय. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सनं (German Research Centre for Geosciences) ही माहिती दिलीय. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचं वृत्त मिळालेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुजेस्तान प्रांतातील एन्डिका काउंटी शहरात हा भूकंप झाल्याचं समजतंय.

मंगळवारी इंडोनेशियाच्या फ्लोरेस (Earthquake in Indonesia) बेटावरील समुद्रात 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता, त्यानंतर हवामान संस्थेनं संभाव्य त्सुनामीचा इशारा दिला होता. मात्र, नंतर तो मागे घेण्यात आला. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, मंगळवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात 18.5 किमी खोलीवर होता, तर मौमेरे शहरापासून सुमारे 112 किमी अंतरावर होता.

Earthquake in Iran
तालिबाननं काबूलवर कसा कब्जा मिळवला; माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले..

मौमेरे हे पूर्व नुसा टेंगारा प्रांतातील दुसरं सर्वात मोठं शहर आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे 85,000 आहे. सुरुवातीला त्सुनामीचा इशारा जारी केल्यानंतर, पॅसिफिक त्सुनामी केंद्र आणि नंतर इंडोनेशियाच्या हवामान संस्थेनं इशारा मागे घेतला. नॅशनल एजन्सीचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितलं, की परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलाय. इंडोनेशियाच्या पूर्व नुसा टेंगारा प्रांतात एक व्यक्ती जखमी झाली असून दक्षिण सुलावेसी प्रांतातील मकस्सर शहर आणि सेलायर आयलंड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com