इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सुचक इशारा

वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

अमेरिका आमि इराणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करत इराणला सूचक इशारा दिला आहे.  ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इराण युद्धात कधी जिंकत नाही, पण तो तहातही हारत नाही'. अप्रत्यक्षपणे त्यांनी युद्धाची भाषा करणाऱ्या इराणला चर्चेचे निमंत्रण दिलेले यातून स्पष्ट होत आहे.

वॉशिंग्टन : अमेरिका आमि इराणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करत इराणला सूचक इशारा दिला आहे.  ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इराण युद्धात कधी जिंकत नाही, पण तो तहातही हारत नाही'. अप्रत्यक्षपणे त्यांनी युद्धाची भाषा करणाऱ्या इराणला चर्चेचे निमंत्रण दिलेले यातून स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकन एअर स्ट्राइकमध्ये कासिम सुलेमानीचा मृत्यू झाल्यानंतर आता इराणकडून बदला घेण्याची भाषा केली जात असताना अमेरिकेला किंमत चुकवावी लागेल असे इराणने स्पष्ट शब्दात म्हटले होते, त्यावर ट्रम्प यांनी हे सूचक ट्विट केले आहे.

कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला खोमेनी यांनी काही टि्वटस केले आहेत. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला त्यांनी इशारा दिला होता. इतकी वर्ष त्यांनी अथक मेहनत घेतली. शहीद होणे हा एक पुरस्कार आहे, असे खोमेनी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले होते.  खोमेनी यांनी म्हटले होते की, 'सर्व शत्रुंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, जिहाद यापुढेही सुरु राहिल आणि त्याला दुप्पट बळ मिळेल, या पवित्र लढाईत निश्चित विजय होईल'. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अमेरिकेवर टीका केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran never won a war, but never lost a negotiation says Donald Trump