Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने कारागृह केले रिकामे; 54 हजार कैद्यांना दिले सोडून!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

जगातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी असलेल्या एमिरेट्स या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

तेहरान : सध्या जगभरात एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोरोना व्हायरस. चीनमध्ये उच्छाद घातल्यानंतर कोरोना हळूहळू आता इतर देशांमध्ये आपले पाय रोवू लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

चीननंतर मध्य आशियातील इराणमध्ये कोरोनाने सर्वात जास्त बळी घेतले आहेत. इराणमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी (ता.३) इराणमधील ८३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, २३३६ इराणी नागरिक कोरोनाच्या विळख्यात पडले आहेत. 

- चिंताजनक : आठ पट वेगाने पसरतोय कोरोना; चीनच्या बाहेर जास्त घातक; जाणून घ्या, बळींचा आकडा!

इराणने कोरोनाचा एवढा धसका घेतला आहे की, तुरुंगातील ५४ हजार कैद्यांना सोडून देण्याचा निर्णय इराण प्रशासनाने घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम सोमवारी (ता.९) इराणमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सुमारे एक लाख लोकांची तपासणी यावेळी केली जाणार आहे. १५ हजार लोकांना पुरेल एवढे संरक्षण साहित्य, ५ लाख मास्क, ३२ लाख हातमोजांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

- कोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण?

तसेच, इराणच्या २३ संसदीय सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे वृत्त फार्स न्यूज एजन्सीने दिले आहे. यूएई आणि सौदी अरेबिया या दोन आखाती देशांची अर्थव्यवस्था २००९ नंतर प्रथमच थंडावल्याचे दिसून आले. तर जगातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी असलेल्या एमिरेट्स या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिका खंडातील व्यापारावर परिणाम झाला आहे. 

दुसरीकडे, यूएईने आर्ट दुबई फेअर हा इव्हेंट पुढे ढकलला आहे, तर कतारनेही दोहा आंतरराष्ट्रीय मेरिटाइम संरक्षण प्रदर्शन आणि परिषद रद्द केली. 

- चीनच्या माध्यमांवर अमेरिकेचे निर्बंध

मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील सद्यस्थिती :

इराण - २३३६, ७७ मृत
कुवेत - ५६
बहारिन - ४९ 
इराक - २५ 
यू.ए.ई - २१
लेबॅनॉन - १३
इस्राईल आणि कतार - ७ 
ओमेन - ६
अल्जेरिया - ५
इजिप्त - २
सौदी अरेबिआ, जॉर्डन, ट्युनिशिया आणि मोरोक्को - १

No photo description available.(सौजन्य : बीबीसी न्यूज नेटवर्क)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran temporarily releases 54000 prisoners to halt the spread of the Coronavirus