Coronavirus : आता उपराष्ट्रपतींना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

- इराणमध्ये 245 जणांना कोरोनाची लागण

तेहरान : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. तर आता चीनमध्ये आणखी 327 नवी प्रकरणं समोर आली आहेत. या व्हायरसमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसची लागण आता उपराष्ट्रपतींना झाली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील 48 देशांतील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी 40 हून अधिक देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे अडीच हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. तर 78 हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. तसेच याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.  

Image result for masoumeh ebtekar

Coronavirus : कोरोनाच्या मृतांची संख्या वाढतीये; आता...

इराणमध्ये 245 जणांना कोरोनाची लागण झाली असून, मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. त्यानंतर आता इराणच्या उपराष्ट्रपती मसूमेह इब्तेकर यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Coronavirus : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय; आणखी 327 प्रकरणं समोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran Vice President Masoumeh Ebtekar Is One of 7 Officials to Contract Coronavirus