इसिसची "खिलाफत' कोसळली;इराकी सैन्य मोसूलमध्ये घुसले

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

तब्बल साडेआठशे वर्षे जुन्या असलेल्या "ग्रॅंड अल नुरी' या मशिदीमधून तीन वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने खिलाफतीची घोषणा केली होती. यानंतर मोसूल हे इसिसची "डि फॅक्‍टो' राजधानी बनले होते

बगदाद - इराकमधील मोसूल शहरातील ऐतिहासिक मशिदीवर इराकच्या सैन्याने आज (गुरुवार) ताबा मिळविला. तब्बल साडेआठशे वर्षे जुन्या असलेल्या "ग्रॅंड अल नुरी' या मशिदीमधून तीन वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने खिलाफतीची घोषणा केली होती. यानंतर मोसूल हे इसिसची "डि फॅक्‍टो' राजधानी बनले होते. या शहराचा ताबा घेण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून रक्तरंजित लढाई सुरु होती. मात्र अंतिमत: इराकी सैन्याने या शहराचा ताबा मिळविला आहे.

इसिसची पीछेहाट होत असताना या संघटनेकडून मोसूल शहरामधील नागरिकांच्या हत्याकांडाबरोबरच शहरातील प्राचीन वास्तुंचे अतोनात नुकसानही करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पश्‍चिम आशियातील राजकारणामध्ये या घटेनेचे दूरगामी पडसाद उमटणार असल्याचे मानले जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Iraq captures historic Mosul mosque