इराककडून सीरियातील इसिसच्या तळावर हवाई हल्ले

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

इराकने सीरियातील इसिसच्या तळावर आज (गुरुवार) हवाई हल्ले केले. एफ - 16 या लढाऊ विमानाच्या साहाय्याने हवाई हल्ल्याची ही कारवाई करण्यात आली.

बगदाद : इराकने सीरियातील इसिसच्या तळावर आज (गुरुवार) हवाई हल्ले केले. एफ - 16 या लढाऊ विमानाच्या साहाय्याने हवाई हल्ल्याची ही कारवाई करण्यात आली. मागील वर्षी इराकच्या हवाई दलाने सीरियामध्ये काही हवाई केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इराककडून ही कारवाई करण्यात आली. 

Iraq Launches Air Strike

इराकचे इराण आणि रशियासोबत चांगले संबंध चांगले आहेत. इसिसविरोधात लढणाऱ्या अमेरिकी संयुक्त आघाडीचा इराकला पाठिंबा मिळत आहे. तसेच इराकचे पंतप्रधान हैदर अल आबादी यांनी यापूर्वी डिसेंबरमध्ये इसिसचा पूर्णपणे पाडाव करण्यात यश आल्याचे जाहीर केले होते. मात्र, इराकच्या जवळ असलेल्या सीरियन सीमालगतच्या भागातून इराकमध्ये इसिसचे बॉम्बहल्ले सुरूच होते. त्यानंतर सीरियन सरकार, राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद आणि इसिसविरोधात लढणाऱ्या अमेरिकी संयुक्त आघाडीच्या पाठिंब्याने इराक इसिसविरोधात लढण्यासाठी हवाई हल्ले करत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iraq Launches Air Strike Against ISIS In Syria