गर्भपातबंदीच्या विरोधात आयर्लंडचा कौल?

पीटीआय
रविवार, 27 मे 2018

लंडन : आयर्लंडमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये गर्भपातासंदर्भातील अतिशय कडक कायदे रद्द करण्याच्या बाजूने जनतेने मुख्यत्वे कौल दिला असल्याचे सार्वमताच्या नंतर केलेल्या पाहणीत स्पष्ट झाल्याचे जाहीर करत आमच्या देशात इतिहास घडतो आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आज व्यक्त केली. 

आयर्लंडमध्ये गर्भपाताच्या संदर्भात अतिशय कडक कायदे आहेत. आयरीश घटनेनुसार गर्भ आणि मातेला जगण्याचे समान अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर गर्भपाच्या संदर्भातील विद्यमान कायदे रद्द करण्याबाबत आयर्लंडमध्ये शुक्रवारी सार्वमत घेण्यात आले. त्यानंतरच्या पाहणीमध्ये सुमारे 68 टक्के नागरिकांनी हे कायदे रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर पंतप्रधान वराडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे, की आमचा देश इतिहास घडवितो आहे. शनिवारी मतमोजणी सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर निकालाची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Ireland may scrap tight rules prohibiting abortion