
आणखी एका देशाकडून मोठी मदत; 700 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पाठवले
आयर्लंड- भारतात कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. दररोज 3 लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळून येताहेत, हजारो लोकांचे जीव जात आहेत. अशा परिस्थितीत जगभरातील देश भारताच्या मदतीला पुढे येत असल्याचं दिसून येतंय. अनेकांनी भारताला मदतीचे आश्वासन दिलं आहे, तर अनेकांनी प्रत्यक्ष मदत सुरु केली आहे. नुकतेच ब्रिटनकडून भारताला ऑक्सिजनचा पुरवठा झाला. आयर्लंडनही मदतीचा हात पुढे केला असून मंगळवारी 700 ऑक्सिजन निर्मिती करणारे कॉन्सेंट्रेटर भारताकडे पाठवले आहेत. 'हिंदुस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय
भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेड्सची कमतरता आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. कॉन्सेंट्रेटर उपकरण हवेतून ऑक्सिजन वेगळे करते आणि ते रुग्णांना पुरवते. बुधवारी सकाळी हे 700 उपकरणx भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. याबरोबरच आयर्लंडने व्हेंटिलेटर पुरवण्याचीही तयारी दाखवली आहे.
हेही वाचा: ब्रिटन, सिंगापूरकडून ऑक्सिजन-व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताकडे रवाना
इरिश राजदूत ब्रेंडन वार्ड म्हणाले की, भारतातील परिस्थितीवर आयर्लंड लक्ष ठेवून आहे. भारताला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पाठbताना आम्हाला अति आनंद होत आहे. आम्ही भारत सरकारच्या संपर्कात असून आणखी काही मदत करता येईल काय हे पाहात आहोत. भारताला व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणे लवकरच पुरवले जातील.
हेही वाचा: पाकिस्तान ते अमेरिका; कोरोना संकटात अनेक देश भारताच्या मदतीला
ऑक्सिजन सिलिंडर पुन्हा भरण्याची आवश्यकता असते. पण कॉन्सेंट्रेटरमधून ऑक्सिजनचा नियमित पुरवठा सुरु असतो. तसेच याचे वजन सिलिंडरपेक्षा कमी असते आणि सहजरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवता येऊ शकते. आयर्लंडने पाठवलेली उपकरणे एकदम नवीन असून कोरोना काळात मदतीसाठी म्हणूनच खरेदी करण्यात आली होती. जर्मनी आणि फ्रान्सनेही भारतासाठी मदत पाठवली आहे.
Web Title: Ireland Send 700 Oxygen Concentrators India Covid Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..