‘इसाइआस’ वादळामुळे दक्षतेचा इशारा

यूएनआय
Tuesday, 4 August 2020

हॅना वादळानंतर आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला ‘इसाइआस’ या वादळाचा धोका निर्माण झाला आहे. पूर्व किनाऱ्यावरील फ्लोरिडाला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानंतर आता वादळाचा रोख आता कॅरोलिनाकडे वळाला आहे. तसेच, हे वादळ तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

न्यूयॉर्क - हॅना वादळानंतर आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला ‘इसाइआस’ या वादळाचा धोका निर्माण झाला आहे. पूर्व किनाऱ्यावरील फ्लोरिडाला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानंतर आता वादळाचा रोख आता कॅरोलिनाकडे वळाला आहे. तसेच, हे वादळ तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ‘इसाइआस’ची तीव्रता कमी झाली होती. मात्र तरीही यामुळे फ्लोरिडामध्ये जोरदार पाऊस पडून अनेक ठिकाणी पूर आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॅरोलिनाच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे वादळ फार मोठे नसून वाऱ्यांचा वेग ११० किमी प्रतितास इतका आहे. मात्र, तरीही वादळाच्या वरील भागातील वाऱ्यांची गती अधिक असल्याने सावध असणे आवश्‍यक आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isaiah warns of the storm