इसिसचा प्रभावी 'प्रपोगंडा चीफ' ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016

बैरुत - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचा प्रचारविभाग प्रमुख (प्रपोगंडा) ठार झाल्याच्या वृत्तास या संघटनेने दुजोरा दिला आहे. 

सीरियामधील राक्का प्रांतामध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अबु मोहम्मद अल-फुर्कान हा ठार झाल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर इसिसकडून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मात्र तो कुठे, कधी वा कसा ठार झाला, यासंदर्भातील कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. 

अल-फुर्कान हा इसिसचा "माहिती मंत्री‘ तर होताच; शिवाय तो संघटनेच्या वरिष्ठ शुरा समितीचाही सदस्य होता. राक्का ही इसिसची अघोषित राजधानी मानली जाते. याच भागामध्ये अल फुर्कान हा त्याच्या घराबाहेर असताना त्याला लक्ष्य करण्यात आले होते. इसिसची प्रचारयंत्रणा ही इतर दहशतवादी संघटनांच्या तुलनेमध्ये अत्यंत प्रभावी मानला जाते.

Web Title: ISIS confirms death of propaganda chief