ISIS मध्ये 66 फायटर्स भारतीय वंशाचे; अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा

isis
isis

जगतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (ISIS) संबंधीत 66 फायटर्स हे भारतीय वंशाचे होते असा खुलासा अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या एका दहशतवाद संबंधीत रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्याचे कौतुक देखील करण्यात आले आहे. नोव्हेंबरपर्यंत, इस्लामिक स्टेटशी संबंध असलेल्या ज्ञात दहशतवाद्यांपेकी 66 जण भारतीय वंशाचे होते, आणि 2020 दरम्यान एकाही विदेशी दहशतवादी फायटर (Foreign Terrorist Fighters) भारतात आणला गेला नाही असे सांगितले आहे.

या रिपोर्टमध्ये आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक दहशतवादी शक्तींचा सक्रियपणे शोधण आणि रोखल्याबद्दल भारताच्या राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) सह भारतीय दहशतवाद विरोधी दलांचेही कौतुक केले आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) इस्लामिक स्टेटशी संबंधित 34 दहशतवाद-संबंधित प्रकरणांचा तपास केला आणि सप्टेंबरमध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमधून 10 कथित अल-कायदाच्या कार्यकर्त्यांसह 160 लोकांना अटक केली. एनआयएने दहशतवाद्यांच्या अटकेबद्द अवहालात म्हटले आहे की, तपास संस्थेने 19 आणि 26 सप्टेंबर रोजी केरळ आणि पश्चिम बंगालमधून अल-कायदाशी संबंधित 10 कथित ऑपरेटिव्हना अटक केली.

isis
ऑनलाईन फ्रीमध्ये भरा तुमचा ITR; 31 डिसेंबर आहे शेवटची तारीख

सप्टेंबर अखेरपर्यंत एनआयएने इस्लामिक स्टेटशी संबंधित 34 दहशतवाद प्रकरणांचा तपास केला आणि 160 जणांना अटक केली. 29 मे रोजी, कोलकाता पोलिसांच्या काउंटर टेररिझम स्पेशल टास्क फोर्सने जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशचा दुसरा कमांडर अब्दुल करीम याला 2013 मध्ये बोधगया बॉम्बस्फोटात त्याच्या सहभागाबद्दल अटक केली.

दहशतवादाच्या तपासाशी संबंधित माहितीसाठी अमेरिकेच्या रिपोर्टला भारत प्रतिसाद देत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांत दोन्ही देशांच्या प्रयत्नांमुळे अनेक दहशतवादी धोके टळले आहेत. दहशतवादी भरती, हिंसाचार, धार्मिक तणाव आणि कट्टरतावाद यासाठी इंटरनेटच्या वापराबद्दल भारतीय अधिकारी चिंतेत असल्याचे देखील या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

isis
'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com