"इसिस'कडून औद्योगिक स्तरावर शस्त्रास्त्रनिर्मिती...

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

इराकी सैन्याकडून इराकमधील मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले जात असताना इसिसची शस्त्रास्त्रनिर्मितीची क्षमताही झपाट्याने कमी होत आहे. मात्र इसिसकडील शस्त्रास्त्रनिर्मितीचे ज्ञान अबाधित असून इसिसचे अनेक कुशल योद्धे निसटून जाण्यात यशस्वी ठरल्याचा इशारा या संस्थेचे संचालक जेम्स बेवन यांनी दिला आहे...

लंडन - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून इराकमधील मोसूल शहराजवळील भागांमध्ये औद्योगिक स्तरावर शस्त्रास्त्रनिर्मिती करण्यात येत असल्याचे एका लष्करी संशोधकांच्या एका संस्थेने म्हटले आहे.

या शस्त्रास्त्रनिर्मितीसाठी इसिसकडून शेजारील तुर्कस्तानमधून मोठ्या प्रमाणात विविध उत्पादनांची खरेदी करण्यात येत आहे. लंडनमधील संशोधन संस्थेने यासंदर्भात तयार केलेला अभ्यास अहवाल आज (बुधवार) प्रकाशित करण्यात आला. इराकमधील शस्त्रास्त्रनिर्मिती तळांवर सापडलेली शस्त्रे आणि इराकी सैन्याविरोधात लढताना इसिसकडून वापरण्यात आलेल्या शस्त्रांच्या अभ्यासावर आधारित हा अहवाल आहे.

इराकी सैन्याकडून इराकमधील मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले जात असताना इसिसची शस्त्रास्त्रनिर्मितीची क्षमताही झपाट्याने कमी होत आहे. मात्र इसिसकडील शस्त्रास्त्रनिर्मितीचे ज्ञान अबाधित असून इसिसचे अनेक कुशल योद्धे निसटून जाण्यात यशस्वी ठरल्याचा इशारा या संस्थेचे संचालक जेम्स बेवन यांनी दिला आहे.

गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात इसिसकडून मोसूल परत घेण्यासाठी इराकी सैन्याकडून मोठी मोहिम हाती घेण्यात आली होती. यानंतर मोसूल शहराच्या काही भागावर नियंत्रण मिळविण्यात इराकी सैन्यास यश आले आहे. मात्र अद्यापी इसिसचा धोका अबाधित असून या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित झालेला या संशोधकांचा हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: ISIS manufacturing arms on industrial scale