चीनमध्ये रक्ताचे पाट वाहतील- इसिसची धमकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

बीजिंग : अल्पसंख्याक चिनी उईघुर वंशाचे इसिसमध्ये भरती झालेल्या दहशतवाद्यांनी चीनमध्ये परत जाऊन तिथे 'रक्ताचे पाट वाहण्याची' शपथ घेतली आहे. इसिसने चीनमधील ठिकाणांना लक्ष्य करीत धमक्या देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

दहशतवाद्यांवर पाळत ठेवणाऱ्या एका संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. इसिसच्या पश्चिम इराकमधील तुकडीने 30 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये चीनमधील उईघुर वंशाचे दहशतवादी बोलताना दिसत आहेत. अमेरिकास्थित SITE गुप्तहेर संस्थेने या व्हिडिओचे विश्लेषण केले आहे. 

चीनमधून हद्दपार करण्यात आलेले उईघुर फुटीरतावादी पश्चिम शिनजिंआँग प्रांतातील हिंसक हल्ल्यांना जबाबदार असल्याचा आरोप चीन अनेक वर्षांपासून करीत आहे. तसेच, इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी उईघुर हातमिळवणी करण्याचा धोकाही चीनने नेहमी व्यक्त केला आहे. या व्हिडिओनंतर उईघुर यांच्याबद्दल खबर देणाऱ्या एकाला जीवे मारले.
 
Web Title: ISIS Releases New Video, Threatens Attack On China