इसिसचा प्रवक्ता अल अदनानी हल्ल्यात ठार

पीटीआय
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

बेरुत - इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल अदनानी हा सीरियात हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त असून, या वृत्ताला इसिसकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

इसिसचा प्रवक्ता आणि वरिष्ठ कमांडर अशी अल अदनानी याची ओळख होती. इसिसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याच्यानंतर अल अदनानी याला दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या मानले जात होते. सीरियातील अलेप्पो शहरात नाटोच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत अदनानी ठार झाला आहे. उत्तर सीरियात इसिसच्या दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान अदनानी ठार झाल्याचे, इसिसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अलेप्पो शहर इसिसच्या ताब्यातून घेण्यासाठी नाटो सैन्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे याठिकाणी जोरदार कारवाई करण्यात येत आहे. अल अदनानी ठार झाल्याचे वृत्त अद्याप नाटोकडून देण्यात आलेले नाही.

Web Title: ISIS spokesperson dead in Syria

टॅग्स