मोठी बातमी! माजी पंतप्रधानांना कोणत्याही क्षणी अटक होणार; पोलीस पोहोचले घरी I Imran Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan Islamabad Police

इम्रान खान यांना अटक झाल्यास पाकिस्तानातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. याला सरकार जबाबदार राहणार आहे.

Imran Khan : मोठी बातमी! माजी पंतप्रधानांना कोणत्याही क्षणी अटक होणार; पोलीस पोहोचले घरी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तोशाखाना प्रकरणी माजी पंतप्रधानांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस (Islamabad Police) लाहोरच्या जमान पार्कमधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद कोर्टानं (Islamabad Court) सरकारी तिजोरीतून (तोशाखाना) कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात विकल्याप्रकरणी इम्रान यांना दोषी ठरवलं आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

तोशाखाना प्रकरणी कारवाई सुरू

तोशाखाना प्रकरणी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस अटक वॉरंट घेऊन लाहोरला पोहोचले आहेत. खान यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

'पाकिस्तानला आणखी अडचणीत आणू नका'

पाकिस्तान मीडियानुसार, 'माजी पंतप्रधान खान यांना सर्व कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्यानंतर अटक केली जाईल.' दरम्यान पीटीआय नेते फवाद चौधरी म्हणाले, इम्रान खान यांना अटक झाल्यास पाकिस्तानातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. याला सरकार जबाबदार राहणार आहे. पाकिस्तानला आणखी अडचणीत आणू नका आणि समजूतदारपणे वागा, असा सल्ला वजा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.