इसिसकडून सुन्नी महिलांवरही होतो बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

बगदाद- इसिस या दहशतवादी संघटनेकडून सुन्नी अरब महिलांवरही बलात्कार होत आहे, अशी माहिती मानवाधिकार संघटनेने आज (सोमवार) दिली.

इसिसकडून सुन्नी महिलांवर होत असलेला बलात्कार व अत्याचाराबाबतचा अहवाल मानवाधिका संघटनेने तयार केला आहे. या अहवालामध्ये म्हटले आहे की, 'इसिसचे दहशतवादी सुन्नी महिलांवर बलात्कार करत असून, जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडतात. विरोध करणाऱया महिलांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली जाते. हविजाह हे गाव अद्यापही इसिसच्या ताब्यात असून, येथील महिलांना अत्याचारला सामोरे जावे लागत आहे.'

मानवाधिकार संघटनेने अत्याचाराचे एक उदाहरण दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'हनान (वय 26) या महिलेसह गावातील अन्य महिलांना इसिसच्या दहशतवाद्यांनी सर्वांसमोर उचलून नेऊन अत्याचार केले. जिहाद पुकारलेल्या एका दहशतवाद्याबरोबर विवाह करण्यासाठी टाकला. विरोध केल्यानंतर डोळे बांधून मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. माझ्या मुलांच्या समोरच माझ्यावर दररोज बलात्कार केले जात होते. इतर महिलांच्या बाबतीतही हेच घडत आहे.'

आंतरराष्ट्रीय समुदाय यामध्ये लक्ष घालून महिलांची सुटका करेल, अशी अपेक्षा हनान यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Islamic State rapes and tortures Sunni Arab women too