इटलीत हिमस्खलनाचे 23 बळी

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

पेन्ने- इटलीमध्ये हिमकडे कोसळून त्याखाली एका हॉटेलची इमारत जमीनदोस्त झाली. त्याखाली चिरडले जाऊन किमान 23 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती हिमस्खलनाच्या ठिकाणी मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिली. 

तसेच, येथे मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने काहीजणांचा मृत्यू झाला. हिमस्खलनापासून जवळच पर्वतीय भागात स्की हा साहसी खेळ करणाऱ्या एका जखमी व्यक्तीला वाचविण्यासाठी गेले तिथे धडकून हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यामध्ये 2 वैमानिक, 3 कर्मचारी आणि एक स्कीअर असे 6 जण मृत्युमुखी पडले. हे कर्मचारी तिथून शंभर किलोमीटर अंतरापर्यंत हिमस्खलनाच्या ठिकाणी सोमवारपर्यंत काम करीत होते. 

हिमस्खलनामुळे 18 जानेवारी रोजी हॉटेल रिगोपियानो भुईसपाट झाल्याने त्याखाली अद्याप 23 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 6 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही, असे मदतकार्य करणाऱ्यांनी सांगितले. 
इटलीचे राष्ट्रप्रमुख पाओलो गेन्तिलोनी हे भूकंपांची मालिका, हिमवृष्टी, हिमस्खलन याबद्दल संसदेत बोलणार आहेत, असे सांगण्यात आले. 
 
Web Title: italy avalanche takes toll to 23