Coronavirus : कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ; इटलीत तर...

Coronavirus : कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ; इटलीत तर...

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 6,63,740 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, आत्तापर्यंत 30,879 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

कोरोना व्हायरसचा फैलाव जगभरात झपाट्याने होत आहे. अमेरिकेत या व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,23,750 वर गेली आहे. तर 2,227 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याची बाब आता जगाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची दिसत आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक असली तरी मृतांचा आकडा हा इटलीमध्येच सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. 

इटलीमध्ये 10,023 जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांची संख्या अमेरिकेत जास्त आहे. पण इटलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अमेरिकेच्या तुलनेने कमी आहे. सध्या इटलीमध्ये 92,472 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद आहे. तर यातील चिंतेची बाब म्हणजे इटलीत तब्बल 10,023 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण होताहेत झपाट्याने बरे

चीनच्या हुबेई प्रांतापासून सुरुवात झालेल्या या कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात झाला आहे. यापूर्वी चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, आता चीनमध्ये 81,439 रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या अमेरिका, इटलीच्या तुलनेत कमी आहे. तसेच यातील महत्त्वाची बाब म्हणजे 75,448 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com