जपानच्या उद्योजकांनी सहकार्य वाढवावे - मोदी

पीटीआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोबे - जपानच्या उद्योजकांनी भारताबरोबर आणखी भागीदारी आणि सहकार्याचे धोरण राबवावे, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उभय देशांतील उद्योग सहकार्यामुळे जपान आणि भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) याचा लाभ होईल. या क्षेत्रातील भागीदारी आणि सहकार्य हे दोन्ही देशांसाठी परिवर्तन ठरू शकेल, असेही मोदी म्हणाले.

कोबे येथे उद्योजकांबरोबर झालेल्या भोजनप्रसंगी बोलताना मोदी यांनी ह्योगो प्रीफेक्‍चरसमवेत असलेले संबंध आणि 2007 तसेच 2012 मध्ये ओसाका बे येथील वसलेल्या कोबे शहराच्या भेटीच्या आठवणी जागवल्या. तत्पूर्वी ह्योगो प्रांतातील विश्रामगृहात मोदी यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी शिक्षण, उद्योग, संस्कृती, आपत्कालीन यंत्रणा आणि पर्यावरण संरक्षणावर सहकार्य वाढविण्यासंदर्भात गुजरात आणि ह्योगो प्रीफेक्‍चर सरकार यांच्यातील करार करण्यात आला. मोदी यांनी म्हटले, की कोबे येथे भारतीय समुदायाचा व्यापार आणि उद्योगाला मोठा इतिहास आहे. कोबे बंदराला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी कोबेच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Japan to increase cooperation with the businessman