स्केटिंग रिंगसाठी पाच हजार जलचरांना गोठविले

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

किताक्‍याश्‍यु (जपान) : मनुष्यप्राणी आपल्या स्वार्थासाठी किती प्राण्यांची हत्या करेल याचा नेम नाही. जपानमध्ये स्पेस वर्ल्ड थीम पार्क अशाच एका घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
या थीम पार्कमध्ये स्केटिंग रिंग बनवण्यासाठी चक्क पाच हजार मासे आणि इतर समुद्रातील जलचर प्राण्यांना गोठवण्यात आले. या घटनेमुळे जगभरातील प्राणी प्रेमी संघटनांनी यावर जोरदार टीका केली आहे.

किताक्‍याश्‍यु (जपान) : मनुष्यप्राणी आपल्या स्वार्थासाठी किती प्राण्यांची हत्या करेल याचा नेम नाही. जपानमध्ये स्पेस वर्ल्ड थीम पार्क अशाच एका घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
या थीम पार्कमध्ये स्केटिंग रिंग बनवण्यासाठी चक्क पाच हजार मासे आणि इतर समुद्रातील जलचर प्राण्यांना गोठवण्यात आले. या घटनेमुळे जगभरातील प्राणी प्रेमी संघटनांनी यावर जोरदार टीका केली आहे.

दक्षिण जपानमधील किताक्‍याश्‍यु येथील "स्पेस वर्ल्ड' हे वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित थीम पार्क आहे. त्यामुळे, हे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या पार्कमध्ये येतात. या थीम पार्कमध्ये स्केटिंगसाठी संपूर्ण जमीन बर्फाची करण्यात आली आहे. या स्केटिंग रिंगच्या सुशोभिकरणासाठी बर्फाच्या खाली वेगवेगळ्या प्रजातीचे सागरी जलचर आणि मासे गोठवले गेले आहे. यावर खेळताना त्याखाली सागरी जलचर फिरत असल्याचा आभास होतो. अशा प्रकारची कल्पना वापरून पहिल्यांदाच अशी स्केटिंग रिंग बनवण्यात आली आहे. त्यामुळे, हे थीम पार्क लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बनले. या थीम पार्कच्या अधिकृत फेसबुक पेजवर याचे फोटो टाकण्यात आले. यातल्या एका फोटोत तर काही माशांचे तोंड उघडे असून अर्धे शरीर गोठलेल्या स्वरुपात दिसत आहे. या बर्फाळ जमीनीत स्टिंग रे, खेकडे, शिंपले असे जलचर ही या पार्कमध्ये गोठलेल्या स्वरुपात आहेत.

हे थीम पार्क मागील आठवड्यातच खुले करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर यावर टीका करण्यात आली. स्पेस वर्ल्डच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्यांनी माफी मागितली आहे. या मनोरंजन पार्कचे जनरल मॅनेजर तोशिमा ताकेदा,यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले,""या थीम पार्कमधील माशांसाठी स्मारक समारंभ करण्यात येईल. हे पार्क रविवारपासून बंद केले असून या स्केटिंग रिंगचे स्वरुप पुन्हा पूर्ववतकरण्यासाठी खटपट सुरू असून ते पुन्हा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल.'' सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया पाहून अखेर या थीम पार्कने माफी मागितली आहे.या पार्कच्या अधिकृत फेसबुक पेजवर नेटिझन्सनी सडकून टिका असून नकारार्थी रिव्ह्यूज सर्वात जास्त पाहायला मिळतील.

या स्केटिंग रिंग बनवण्यासाठी वापरण्यात आलेले मासे हे पूर्वीपासूनच मृतावस्थेत असल्याचे पार्कच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. हे मासे मृतावस्थेत असताना बाजारातून घेतल्याचे पार्कने दिलेल्या माफीनाम्यात म्हटले आहे. कोणत्याही जिवंत माश्‍यांची क्रूरपणे हत्या केली नसल्याचे त्यांनी यांत म्हटले आहे. पण आता सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून जगभरातील प्राणीप्रेमींना यापुढील निर्णयाची उत्सुकता आहे.

Web Title: Japan skating rink shuts over frozen fish controversy

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी