जपानमध्ये क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

टोकियो : "एप्सिलॉन-2' या घन इंधन स्वरूपातील क्षेपणास्त्राचे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. जपानमधील उचिनोरा अवकाश केंद्रातून आज या 26 मीटर लांब क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.

पृथ्वीभोवतीच्या उर्त्सजनाचा अभ्यास करण्यासाठीचा उपग्रह या क्षेपणास्त्रातून पाठविण्यात आल्याची माहिती जपान एरोस्पेस इक्‍सप्लोरेशन एजन्सीने (जाक्‍सा) दिली आहे.

एप्सिलॉन-2 हे तीन टप्प्यातील क्षेपणास्त्र असून ते नव्या पिढीतील घन इंधन स्वरूपातील असल्याने एकूण प्रकल्पाचा खर्च एक तृतीआंश इतका कमी झाल्याचे जाक्‍साने सांगितले.

Web Title: japan successfully test fires missile