3 मिनिटे अगोदर जेवण घेतल्याने कर्मचाऱ्याचा कापला अर्धा पगार

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

लंचब्रेक होण्यापूर्वी 3 मिनिटे अगोदर डेस्कवरून तो निघून लंचसाठी गेला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याला शिक्षा म्हणून अर्ध्या दिवसाचा पगार कापला.

टोकियो : सुट्ट्या काढल्या किंवा अर्धा दिवस काम केले म्हणून बहुतांश कंपन्यांकडून पगार कापला जातो. मात्र, जपानमध्ये फक्त 3 मिनिटे अगोदर दुपारचे जेवण घेतल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला शिक्षा करण्यात आली. शिक्षा म्हणून त्या कर्मचाऱ्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कापण्यात आला.

Japan workers

संबंधित कर्मचारी कोबेच्या पश्चिम शहरातील एका कंपनीमध्ये कामाला होता. या कर्मचाऱ्याने सात महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल 26 वेळा वेळेपूर्वी लंच केले होते, अशी माहिती येथील प्रवक्त्यांनी दिली. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लंच ब्रेक दुपारी 1 वाजता ठेवण्यात आला. मात्र, लंचब्रेक होण्यापूर्वी 3 मिनिटे अगोदर डेस्कवरून तो निघून लंचसाठी गेला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याला शिक्षा म्हणून अर्ध्या दिवसाचा पगार कापला. मात्र, याबाबतची चर्चा सगळीकडे सुरु झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी माफी मागितली.

दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारीमध्ये कार्यालयातून अनेकदा ये-जा केल्यामुळे आणि कामाच्या वेळेत तयार झालेला लंच बॉक्स मागितल्यामुळे येथील एका कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर आता या कर्मचाऱ्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कापण्यात आला.  

Web Title: Japan workers pay cut for taking lunch 3 minutes early

टॅग्स