चंद्रावर फिरायला येण्यासाठी 'अशी' गर्लफ्रेंड पाहिजे...

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

चंद्रावर फिरायला जाणार असून, सोबत येण्यासाठी गर्लफ्रेंड हवी असल्याची ऑनलाइन जाहिरात एका उद्योगपतीने दिली आहे. शिवाय, गर्लफ्रेंड कशी हवी, यासाठी काही नियम घातले आहेत. संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टोकियो (जपान) : चंद्रावर फिरायला जाणार असून, सोबत येण्यासाठी गर्लफ्रेंड हवी असल्याची ऑनलाइन जाहिरात एका उद्योगपतीने दिली आहे. शिवाय, गर्लफ्रेंड कशी हवी, यासाठी काही नियम घातले आहेत. संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियकराला वाचवण्यासाठी कुलरमध्ये लपवले पण...

जपानचे प्रसिद्ध उद्योगपती आणि ऑनलाइन फॅशन रिटेलर जोजो कंपनीचे सीईओ यूसाको माएजावा यांनी जाहिरात दिली आहे. यूसाको माएजावा हे हे चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक असणार आहेत. अमेरिकेतील खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्स रॉकेटमधून ते चंद्रावर फिरण्यासाठी जाणार आहेत. पण, त्यांना सोबत म्हणून एका मैत्रिणीची आवश्यकता आहे.  मैत्रिण हवी म्हणून, त्यांनी ऑनलाइन जाहिरात दिली आहे. जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, 'मुलीचे वय 20 पेक्षा जास्त असावे. ती सुंदर आणि सिंगल असायला हवी. गर्लफ्रेंड होण्यासाठी अर्ज करण्याची तारीख 17 जानेवारी पर्यंत आहे. यानंतर शॉर्टलिस्ट कऱण्यात आलेल्या मुलींच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर गर्लफ्रेंडची निवड केली जाईल. चंद्रावर फिरायला जाणारी पहिली महिला का होऊ नये?'

पत्नीला म्हणाला, बाहेर चाललोय अन् गेला लॉजवर

यूसाको माएजावा यांचे जपानी अभिनेत्रीसोबत ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे ते मैत्रिणीच्या शोधात आहेत. एका टीव्ही शो दरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की, 'आयुष्यात मी एकाकी जीवन जगत असून, चंद्रावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आहे. लहानपणापासून माझे चद्रावर प्रेम आहे आणि आयुष्याचं ते स्वप्नही आहे. मला जस हवं होतं तसं आयुष्य आजपर्यंत जगलो आहे. यापुढेही तसेच जगणार आहे. माझे वय आता 44 असून, एकटेपणा अनुभवत आहे. एक गोष्ट आहे जी मिळवण्याचा विचार मी करत आहे आणि ते म्हणजे महिलेचे प्रेम. आयुष्यातला एकटेपणा घालवण्यासाठी ते गरजेचे आहे.'

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

दरम्यान, यूसाको माएजावा 2023 मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात चंद्रावर फिरायला जाणार आहेत. एलन मस्कची कंपनी स्पेस एक्स सर्व तयारी करत आहे. या ट्रिपवर ते एका आर्टिस्टलासुद्धा घेऊन जाणार आहेत.

शेतात पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: japanese billionaire yusaku online advertisment for girlfriend on moon trip