Video: माझी शस्त्रक्रिया फेसबुक लाईव्ह करा...

jenna schardt facebook live during brain surgery operation
jenna schardt facebook live during brain surgery operation

टेक्सास : अमेरिकेतील एका युवतीवर मेंदूची शस्त्रक्रिया करायची होती. पण, तिने एक अट घातली होती की शस्त्रक्रिया करताना फेसबुकवरून लाईव्ह करायची म्हणून. डॉक्टरांनी अखेर तिची इच्छा पूर्ण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला असून, लाखो नेटिझन्सनी तो पाहिला आहे.

अमेरिकेतील मेथॉडिस्ट डल्लास मेडिकल सेंटरने मेंदूची शस्त्रक्रिया फेसबुकवर लाईव्ह केली. टेक्सासमध्ये राहणाऱ्या जेन्ना स्कार्ड्टच्या (वय 25) डोक्याच्या एका भागात रक्त साचले होते. यामुळे तिला बोलण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. पण, जेन्नाने ही शस्त्रक्रिया फेसबुकवरून लाईव्ह करण्याची अट घातली. जेन्नाला भिती होती की तिची बोलण्याची क्षमता गमावणार तर नाही ना. शस्त्रक्रियेवेळी तिला सतत बोलत रहायचे होते.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरु करताना सुरुवातीचा काही वेळ फेसबुक लाइव्ह केले. यावेळी जेन्ना डॉक्टरांसोबत बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. जेन्ना पडद्याच्या दुसऱ्या बाजूला असून, डॉक्टर शस्त्रक्रिया करताना दिसत आहेत. मेथोडिस्ट डल्लास मेडिकल सेंटरच्या न्यूरॉलॉजीचे प्रमुख भारतीय वंशाचे डॉक्टर निमेश पटेल आहेत. पटेल म्हणाले, 'जेन्नाच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. यामुळे तिला बोलण्यात अडचणी येत होत्या. जेन्ना शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांशी बोलत होती.'

दरम्यान, जेन्ना ऑक्यूपेशनल थेरपीची विद्यार्थीनी आहे. शस्रक्रियेचा अनुभव तिला लोकांपर्यंत पोहचवायचा होता. तिच्या या धाडसाचे डॉक्टरांसह अनेकजण कौतुक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com