द्विपक्षीय संबंधांना चालना; इस्राईलच्या अध्यक्षांशी नरेंद्र मोदींची व्यापक चर्चा

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

जेरुसलेम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे अध्यक्ष रुवन रिवलिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणखी भक्‍कम बनविण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर व्यापक चर्चा केली.

इस्राईलच्या अध्यक्षांनी माझे अतिशय उत्साहात स्वागत केले. त्यांनी राजशिष्टाचार मोडला. हे भारताच्या लोकांप्रती आदराचे संकेत आहेत, असे ट्विट मोदी यांनी केले. तीनदिवसीय दौऱ्यावर असलेले मोदी काल तेल अवीव येथे पोचले. त्यानंतर त्यांनी रिवलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेथील उत्साही आदरातिथ्य तसेच मित्रत्वासाठी त्यांना धन्यवाद दिले.

अध्यक्षांच्या निवासस्थानी असलेल्या अतिथी पुस्तकात मोदींनी लिहिले की, अध्यक्ष रिवलिन यांच्याशी आज पुन्हा भेट झाल्यामुळे अतिशय आनंद झाला. मला गेल्या नोव्हेंबरमधील त्यांचा भारत दौरा आठवतो, त्या वेळी त्यांनी आपल्या विनयशील वर्तन आणि भारतासाठी काहीतरी चांगले करण्याच्या इच्छेने आमचे मन जिंकले होते. अध्यक्ष रिवलिन त्यांच्या विश्‍वास आणि मानवतेच्या भल्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी भारतात ओळखले जातात. मी त्यांना त्यांची मैत्री आणि आदरातिथ्यासाठी धन्यवाद देतो.

'रामानुजन हे भारतीयांच्या बुद्धिमतेचे प्रतीक'
प्रसिद्ध भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन भारतीयांच्या बुद्धिमतेचे प्रतीक असल्याचे प्रशंसोद्‌गार काढत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दोन्ही देश बुद्धिमतेच्या क्षेत्रात भागीदारीवर विश्‍वास ठेवतात, असे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साथीत निवेदन जारी करताना नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, आम्ही भारताच्या लोकांचा अतिशय आदर करतो. मी आणि मोदी एकत्रितपणे दोन्ही देशांच्या जनतेसाठी चांगले भविष्य घडविण्याची इच्छा बाळगतो.

Web Title: jerusalom news marathi news narendra modi