सोशल मीडिया कळतं? तर 26 लाख पगाराची एक आहे नोकरी!

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

त्या नोकरीविषयी अधिक माहिती 
- कामाचा विभाग : रॉयल कम्युनिकेशन्स 
- ठिकाण : बकिंगहॅम पॅलेस 
- कामाचे स्वरूप : कायमस्वरूपी 
- साधारण मानधन : 30,000 पौंड 
- कामाचे तास : आठवड्यातून 37.5 तास; सोमवार ते शुक्रवार

लंडन : डिजिटल कम्युनिकेशनमध्ये काम करता? मग कदाचित तुमच्यासाठी परदेशात एक चांगली संधी असू शकते. ब्रिटिश रॉयल कम्युनिकेशन्सच्या चमूमध्ये डिजिटल कम्युनिकेशन अधिकारी ही जागा भरायची आहे. या पदासाठी पगार जवळपास 26 लाख रुपये इतका असेल आणि 'क्‍लाएंट' म्हणजे खुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय असेल. 'जनता आणि जगासमोरील राणीची प्रतिमा तयार करणे आणि तिचे संवर्धन करणे' हे या पदावरील अधिकाऱ्याचे प्रमुख काम असेल. 

Queen Elizabeth 2

ही आहे त्या पदासाठीची पात्रता: 
- वेबसाईट्‌स अपडेट करण्याचा आणि डिजिटल कम्युनिकेशन्सच्या कामाचा पूर्वानुभव 
- डिजिटल कन्टेंट तयार करणे आणि सोशल मीडियावरील कामाचा अनुभव 
- डिजिटल मीडियामधील ताज्या बदलांची माहिती असणे आणि ते बदल आत्मसात करण्याची कला असणे 
- कलात्मक, प्रभावी आणि नावीन्यपूर्ण कल्पना मांडू शकणारा 
- उत्तम छायाचित्रणकला अवगत असावी 
- अचूक नियोजन आणि नियोजनाची अंमलबजावणीचे कौशल्य 

त्या नोकरीविषयी अधिक माहिती 
- कामाचा विभाग : रॉयल कम्युनिकेशन्स 
- ठिकाण : बकिंगहॅम पॅलेस 
- कामाचे स्वरूप : कायमस्वरूपी 
- साधारण मानधन : 30,000 पौंड 
- कामाचे तास : आठवड्यातून 37.5 तास; सोमवार ते शुक्रवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job available of 26 lakhs per month at London