बरे झाले, ते येत नाहीत...

पीटीआय
Sunday, 10 January 2021

ज्यो बायडेन यांच्या शपथविधीला आपण जाणार नाही, असे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल (ता. ८) जाहीर केल्यावर बायडेन यांनी ‘बरे झाले’ अशी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर बायडेन यांना ट्रम्प यांच्या न येण्याबाबत विचारण्यात आले.

वॉशिंग्टन : ज्यो बायडेन यांच्या शपथविधीला आपण जाणार नाही, असे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल (ता. ८) जाहीर केल्यावर बायडेन यांनी ‘बरे झाले’ अशी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर बायडेन यांना ट्रम्प यांच्या न येण्याबाबत विचारण्यात आले.

यावेळी बायडेन म्हणाले,‘‘ते येत नाही, ही चांगली गोष्ट आहे. आमच्यात दोघांमध्ये फार कमी मुद्द्यांवर एकमत झालेल्या मुद्द्यांपैकी हा एक आहे. मला ते जितके विचित्र असल्याची माझी भावना होती, त्यापेक्षाही ते अधिक विचित्र आहेत. त्यांनी देशाला मान खाली घालायला लावली.’’ उपाध्यक्ष माइक पेन्स हे शपथविधीला येत असल्याबद्दल मात्र बायडेन यांनी आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्रम्प यांनी नेहमीच योग्य वक्तव्य केले असे नाही. त्यांनी अनेक वेळा चुकीचे शब्द वापरले, कालही तसेच केले. केवळ शब्दच नाही, तर त्यांच्या अनेक कृत्यांबद्दल इतिहास त्यांना प्रश्‍न विचारणार आहे. मतभेद असला तर आपण बोलू शकतो, पण अमेरिकी नागरिकांना एकमेकांविरोधात भडकावणे थांबवायला हवे. 
- निक्की हॅले, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: joe biden oath ceremony donald trump absent nikki haley