लोकशाही यंत्रणेला कायमस्वरुपी धोका; बायडेन यांची ट्रम्प यांच्यावर टीका

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक नेत्यांनी संसदेत कॅपिटॉलवरील हल्ल्याचा निषेध करणारी भाषणे केली.
Joe BIden
Joe BIdenSakal

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गेल्या वर्षी निवडणुकीदरम्यान खोट्याचा प्रचार करत लोकशाहीच्या (Democracy) गळ्याला नख लावले आणि त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीवर हल्ला झाला, अशा शब्दांत अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांच्यावर काल (ता. ६) जोरदार टीका केली. कॅपिटॉल इमारतीवर झालेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केलेल्या भाषणात बायडेन यांनी, अमेरिकेच्या लोकशाही यंत्रणेला कायमस्वरुपी धोका निर्माण झाला असल्याचा इशाराही दिला.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक नेत्यांनी संसदेत कॅपिटॉलवरील हल्ल्याचा निषेध करणारी भाषणे केली. संसदेत दोन मिनिटे शांतताही पाळण्यात आली. गेल्या वर्षीचे द्वेषाचे वातावरण विसरून आता सलोखा निर्माण व्हावा, असे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने केले गेले होते. मात्र, रिपब्लिकन पक्षाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. देशामध्ये अद्यापही राजकीय विद्वेषाचे वातावरण असल्याचे आणि ट्रम्प यांची अजूनही त्यांच्या समर्थकांवर पकड असल्याचे यावेळी दिसून आले, असे विश्‍लेषकांनी सांगितले.

आपल्या भाषणात बायडेन म्हणाले,‘‘देशाच्या इतिहासात प्रथमच विद्यमान अध्यक्षांचा केवळ निवडणूकीत पराभवच झाला नाही, तर त्यांनी शांततापूर्ण सत्तेचे हस्तांतर होण्यातही अडथळे आणले. तुम्ही फक्त जिंकल्यावरच देशावर प्रेम व्यक्त करू शकता, असे नाही. जनतेने तो काळा दिवस आठवावा. ट्रम्प यांनी खोटेपणाचा प्रचार करत लोकशाहीला नख लावले होते.’’ गेल्या वर्षभरात बायडेन यांनी कॅपिटॉलवरील हल्ल्याबाबत आणि ट्रम्प यांच्याबाबत मोजक्या शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आज मात्र त्यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाषण करताना बायडेन हे भावनिकही झाले होते.

‘६ जानेवारी’ हे प्रकरण संपलेले नाही. तसाच धोका आणि त्याला खतपाणी घालणारे असत्य अद्यापही कायम आहे. आपल्या लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला सत्याची आवश्‍यकता आहे.

- ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com