बायडेन यांचा लशीचा ‘ॲक्शन प्लॅन’

joe-biden
joe-biden

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवे निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसात अमेरिकेतील दहा कोटी लोकांना कोविड लस देण्याचा निर्धार केला आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी संपूर्ण देशाला एकासूत्रात बांधले जाईल. लसीकरण मोहिमेबरोबरच तपासणी आणि अन्य उपायांसाठी अब्जावधी डॉलरचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही बायडेन म्हणाले. 

येत्या बुधवारी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेत असून लसीकरण मोहिमेतून कोरोना संकटाचा समर्थपणे सामना करु, याचा मला विश्‍वास असल्याचे बायडेन म्हणाले. लसीकरण आणि अन्य कामांसाठी जादा निधीची गरज असून त्यासाठी संसंदेला मंजुरी द्यावी लागणार आहे. मास्कचा नियमित वापर, गर्दीपासून दूर राहणे आणि हात सतत धुणे या मुलभूत गोष्टींचे पालन करण्याचे बायडेन यांनी आवाहन केले. लसीकरण हा राजकीय मुद्दा नसून तो जीव वाचवण्याशी निगडीत आहे. मात्र या गोष्टीला राजकीय रंग दिला जात आहे. 

हा शुद्ध मुर्खपणा असून तो अजूनही सुरूच असल्याची टीका बायडेन यांनी केली. यादरम्यान, बायडेन यांनी कालच १.९ ट्रिलियन डॉलरची मदत जाहीर केली असून या पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना आर्थिक मदत देण्याचे सरकारचे नियोजन आहे. या योजनेत ४०० अब्ज डॉलरची तरतूद कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी केली आहे. या योजनेतंर्गत लसीकरण मोहिम राबवणे आणि कोरोनाशी संबंध अन्य उपाय केले जाणार आहेत. अमेरिकेत आतापर्यंत २३,५२३,००० जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३९१,९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com