McAfee अँटीव्हायरसच्या संस्थापकाची स्पेनच्या तुरुंगात आत्महत्या

John McAfee
John McAfee
Summary

McAfee अँटी व्हायरस सॉफ्टवेयरचे (McAfee antivirus software) निर्माते जॉन मॅकफली (John McAfee) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह स्पेनच्या बार्सिलोनातील तुरुंगात लटकलेल्या अवस्थेत आढळला.

नवी दिल्ली- McAfee अँटी व्हायरस सॉफ्टवेयरचे (McAfee antivirus software) निर्माते जॉन मॅकफली (John McAfee) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह स्पेनच्या बार्सिलोनातील तुरुंगात लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते ७५ वर्षांचे होते. विशेष म्हणजे बुधवारी स्पेन न्यायालयाने त्यांना अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याचा आदेश दिला होता. अमेरिकेत जॉन मेकफली यांच्यावर टॅक्स चोरीचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात त्यांना कमीतकमी ३० वर्षांची शिक्षा होऊ शकली असती. (John McAfee McAfee antivirus software pioneer turned fugitive dies in Spanish prison)

जॉन मॅकफली यांनी १९९४ मध्ये व्हायरसविरोधात लढणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीची विक्री केली होती. त्यानंतर २००८ च्या आर्थिक मंदीत त्यांनी आपली पुष्कळ संपत्ती गमावली. तेव्हापासून मॅकफली फिरस्ती जिवन जगत होते. अमेरिकेने त्यांच्यावर टॅक्स चोरीचा आरोप लावला होता. त्यानंतर २०२० मध्ये स्पेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली. मॅकफली यांच्याप्रकरणी स्पेनच्या कोर्टात सुनावणी सुरु होती. एका दिवसापूर्वी स्पेन कोर्टाने त्यांना अमेरिकेत प्रत्यार्पित करण्याचा आदेश दिला होता.

John McAfee
कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

अमेरिकेच्या न्याय विभागाने जॉन मॅकफली यांच्यावर आरोप लावला होता की, 'त्यांनी आपल्या सर्व संपत्तीची माहिती दिलेली नाही. त्यांनी क्रिप्टोकरन्सीला cryptocurrencie चालना देऊन, कन्सल्टींगचे काम करुन, अनेक ठिकाणी लेक्चर देऊन आणि त्यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी करण्यास परवानगी देऊन कोट्यवधी रुपये जमवले होते. पण, यासंबंधी त्यांनी टॅक्स भरला नाही. त्यांनी अनेक पळवाटा शोधल्या.' जॉन मॅकफली यांच्यावरील हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना ३० वर्षांपर्यंत शिक्षा झाली असती.

John McAfee
किम जोंगच्या बहिणीने अमेरिकेला तिखट शब्दांत सुनावलं

जॉन मॅकफली यांनी या आरोपांचे वारंवार खंडन केले. टॅक्सच्या स्वरुपात मी आतापर्यंत लाखो रुपये दिले आहेत. पण, राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्यावर आरोप केले जात आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. दरम्यान, मॅकफली यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांना दारुचे व्यसन होते. ते त्यांना आणि आईला सतत मारहाण करायचे. मॅकफली १५ वर्षाचे असताने त्यांच्या वडिलांनी स्वत:वर गोळी चालवली. मॅकफली यांना विविध प्रकरणांमध्ये तुरुंगात जावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com