Coronavirus Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लशीची चाचणी थांबवली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

जॉन्सन अँड जॉन्सनने लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे परीक्षण सुरु केले होते. या अंतर्गत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरुतील 60 हजार लोकांवर याचे परीक्षण केले जाईल, असे कंपनीने म्हटले होते.

नवी दिल्ली- जगभरात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी कोरोना लस तयार करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. याचदरम्यान एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोना लशीची चाचणी रोखली आहे. चाचणीत सहभागी असलेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सनने सध्या कोरोना लशीची चाचणी बंद केली आहे. 

न्यूजर्सी कंपनी न्यू ब्रांसविकचे प्रवक्ते जॅक सर्जेंट यांनी आरोग्याबाबतचे वृत्त देणारी संस्था एसटीएटीचा अहवाल बरोबर असल्याचे सांगितले आणि जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लशीची चाचणी बंद केल्याचे कबूल केले. 

हेही वाचा- Positive Story : एक महिन्याच्या लेकीला घेऊन कामावर हजर झाल्या SDM साहिबा

या महिन्याच्या सुरुवातीला जॉन्सन अँड जॉन्सनचा अमेरिकामध्ये लस बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची एडी 26-सीओव्ही 2-एस लस अमेरिकेतील चौथी अशी लस आहे जी क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात आहे. मागील वेळच्या अहवालात म्हटले होते की, या लशीच्या सुरुवातीच्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूविरूद्ध तीव्र प्रतिकारशक्ती निर्माण होते. संशोधकांच्या मते, आतापर्यंतच्या परीक्षणाचे गंभीर दुष्परिणाम पडले नव्हते. 

हेही वाचा- Hathras: तुमची मुलगी असती तर असेच अंत्यसंस्कार केले असते का, हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

जॉन्सन अँड जॉन्सनने लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे परीक्षण सुरु केले होते. या अंतर्गत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरुतील 60 हजार लोकांवर याचे परीक्षण केले जाईल, असे कंपनीने म्हटले होते. यापूर्वी अ‍ॅस्ट्रोजेनका कंपनीने कोरोना लशीची चाचणी रोखली होती. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनकडूनही अशाचप्रकारचे वृत्त समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Johnson & Johnson Pauses Covid Vaccine Trial As Participant Falls sick