नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा के. पी. ओली

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

ते नेपाळचे 41 वे पंतप्रधान आहेत. चीनचे समर्थक असलेले ओली 11 ऑक्‍टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानपदी होते. शपथविधीपूर्वी माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला

काठमांडू - नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांची दुसऱ्यांदा निवड झाली. त्यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली. नेपाळमधील संसदेच्या निवडणुकीत ओली यांच्या डाव्या पक्षाच्या आघाडीने ऐतिहासिक विजय मिळविला होता. पूर्वीच्या नक्षलवादी बंडखोरांच्या संघटनेशी त्यांनी युती केली आहे.

नेपाळच्या अध्यक्षांच्या कार्यालयात अध्यक्षा विंध्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शपथ दिली. ते नेपाळचे 41 वे पंतप्रधान आहेत. चीनचे समर्थक असलेले ओली 11 ऑक्‍टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानपदी होते. शपथविधीपूर्वी माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला.

Web Title: k p sharma oli nepal prime minister