काबूलमध्ये बाँबस्फोटात ९५ ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

काबूल - एका रुग्णवाहिकेद्वारे काबूल शहरातील गर्दीच्या ठिकाणी घडवून आणलेल्या बाँबस्फोटात ९५ नागरिक ठार झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, गृह मंत्रालयाच्या जुन्या इमारतीनजीक हा स्फोट झाला. 

स्फोटकांनी भरलेली रुग्णवाहिका घेऊन आलेल्या एका आत्मघाती दहशतवाद्याने पहिल्या चेक नाक्‍यावर रुग्णवाहिकेत एक रुग्ण असून, त्याला जमुरीयत रुग्णालयात नेत असल्याचे सांगत सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा दिला. त्यानंतर दुसऱ्या चेक नाक्‍यावर त्याने रुग्णवाहिकेतील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. यात ९५ नागरिक ठार तर, १५८ जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्याचे हादरे दोन कि.मी. अंतरावर जाणवले. या हादऱ्यामुळे आसपासच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍याताही व्यक्त होत आहे. दरम्यान, तालिबानी दहशतवाद्यांनी नुकत्याच एका आलिशान हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात १५ विदेशी नागरिक होते. या पार्श्वभूमीवर रविवारी सुरक्षा यंत्रणांनी विदेशी नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kabul international news 95 death in bomb blast