esakal | Kabul: भयभीत संगीताचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी अखेर काबूल सोडले
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी अखेर काबूल सोडले

भयभीत संगीताचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी अखेर काबूल सोडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल : तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात मनोरंजनावर बंधने आणल्यानंतर संगीताचे शिक्षण घेणारे आणि शिक्षकांचे आयुष्य अडचणीत आले आहे. या भीतीमुळे सुमारे शंभर विद्यार्थी आणि शिक्षकांनी जीव मुठीत घेत सोमवारी दोहाला जाणारे विमान पकडले व सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

तालिबानच्या नव्या नेत्यांकडून संगीतावर घाला घातला जात असल्याने संगीत संस्थेचे सुमारे १०१ सदस्य दोहा येथे सोमवारी सायंकाळी काबूलहून दाखल झाल्याचे संस्थेचे संस्थापक, प्राचार्य अहमद सरमस्त यांनी सांगितले. काबुल सोडणाऱ्या विद्यार्थ्यांत निम्मे महिला आणि मुलींचा समावेश आहे. अफगाणिस्तान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकचे संस्थापक सरमस्त हे सध्या मेलबर्न येथे असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पोर्तुगाल सरकारचे सहकार्य घेतल्याचे सांगितले. या सुटका मोहिमेला यश मिळेल की नाही, शेवटपर्यंत सांगता येत नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

कतार दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्यांना गटागटाने काबूल विमानतळावर आणण्यात आले. यात पहिलाच अडथळा होता तो तालिबानी दहशतवाद्यांचा. काबूल विमानतळावर तैनात असलेल्या दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांकडे व्हिसाची मागणी केली. परंतु कतार दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्‍न निकाली काढल्याने विद्यार्थ्यांना तेथून निघणे शक्य झाले. महिला आणि मुलींना तात्पुरत्या सेवा पारपत्राच्या आधारे देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली जात नव्हती.

संगीत शिकणाऱ्यांनाे घरातच राहा!

तालिबानने सत्ता सांभाळल्यानंतर संगीत महाविद्यालय आणि संस्थेच्या सदस्यांना पुढील सूचना येईपर्यंत घरातच राहण्याची तंबी दिली आहे. आता दोन महिने होत आले आहेत. पुढील कोणतेही नवीन आदेश दिलेले नाहीत, असे सरमस्त म्हणाले.

loading image
go to top