कॅन्सासमधील भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये घबराट

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कॅन्सास शहरामध्ये राहत असलेल्या भारतीय-अमेरिकन समुदायामधील काही जणांनी या घटनेमुळे येथील सुरक्षेचा पुनर्विचार करावा लागणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅन्सास शहरामधील येथील एका बारमध्ये वांशिक विद्वेषामधून एका भारतीय अभियंत्याच्या करण्यात आलेल्या क्रूर हत्येच्या पार्श्‍वभूमीवर या भागात राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

श्रीनिवास  कुचिभोतला (वय 32) या भारतीय अभियंत्याची अमेरिकन नौदलामधील निवृत्त अधिकारी असलेल्या ऍडम प्युरिंटन (वय 51) याने गोळी घालून हत्या केली होती. याशिवाय, प्युरिंटन याने अलोक मदसानी (वय 32) यालाही गोळी घातली होती. तसेच या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अमेरिकन नागरिकावरही प्युरिंटन याने गोळीबार केला होता. गोळीबार करण्याआधी प्युरिंटनने "माझ्या देशातून निघून जा' असे म्हटल्याचेही आढळून आले आहे. 

कॅन्सास शहरामध्ये राहत असलेल्या भारतीय-अमेरिकन समुदायामधील काही जणांनी या घटनेमुळे येथील सुरक्षेचा पुनर्विचार करावा लागणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Web Title: Kansas shooting raises fears with local Indian-Americans