भूकंपाच्या धक्‍क्‍याने नेपाळ पुन्हा हादरले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

तीव्रता 5.2 रिश्‍टर स्केल; काठमांडू खोऱ्यालाही हादरे

काठमांडू: नेपाळमधील दोलखा जिल्ह्याला आज मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती नेपाळच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली. या भूकंपाची तीव्रता 5.2 नोंदविण्यात आली. नेपाळला 2015मध्ये बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर अनेक कमी तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. आज बसलेला भूकंपाचा धक्का हाही त्याच प्रकारचा होता, असे भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले. या भूकंपामध्ये नेमके किती नुकसान झाले याची माहिती संध्याकाळपर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती.

नेपाळमधील दोलखा जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 5.2 रिश्‍टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून ईशान्येकडे 160 किलोमीटर अंतरावर, जमिनीत दहा किलोमीटर खोलीवर होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोलखाच्या शेजारील काठमांडू खोऱ्यातील जिल्ह्यांनाही या भूंकपाचे हादरे जाणवल्याचे सांगण्यात आले.

एप्रिल 2015पासून 487 हादरे
एप्रिल 2015मध्ये विनाशकारी भूकंपाच्या धक्‍क्‍याने नेपाळ हादरले होते. त्या वेळी 7.8 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता, त्यास गोरखा भूकंप म्हणून ओळखले जाते. या भूकंपात सुमारे नऊ हजार जण मृत्युमुखी पडले होते, तर सुमारे 22 हजार जण जखमी झाले होते. तसेच, लाखो नागरिक बेघर झाले होते. एप्रिल 2015मध्ये बसलेल्या मोठ्या भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर नेपाळला आत्तापर्यंत चार किंवा त्या पेक्षा अधिक रिश्‍टर स्केल तीव्रतेचे एकूण 487 धक्के जाणवले असल्याची माहिती भूगर्भशास्त्र विभागाकडून देण्यात आली.

गुआम बेटेही हादरली
वॉशिंग्टन, ता. 8 (यूएनआय) ः अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या गुआम बेटांना शुक्रवारी भूकंपाचा मोठा धक्का बसल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 6.6 नोंदविण्यात आली. या भूकंपामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यानंतर सुनामी निर्माण होण्याची शक्‍यता नसल्याचे अमेरिकेच्या सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीसह कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया आणि अलास्काच्या किनाऱ्यांवर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kathmandu news Nepal shook again with earthquake shocks