कझाकस्तानमध्ये 'बर्निंग बस' दुर्घटनेत 52 ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

अकटोबे या दुर्गम भागातील रस्त्यावरून ही बस जात होती. हा रस्ता रशियातील समराला जोडला जातो. तसेच येथून उझबेकिस्तानची सीमाही जवळ आहे. ही बस कोणत्या दिशेने जात होती हे स्पष्ट झालेले नाही. आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली

अस्ताना  - वायव्य कझाकस्तानमध्ये बस पेटल्याने 52 उझबेक नागरिकांचा मृत्यू झाला. निर्वासित कामगारांना रशियात जाण्यासाठी व येण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला जातो, तेथे ही दुर्घटना घडल्याचे कझाकस्तानच्या गृहमंत्र्यांनी सांगितले.

अकटोबे या दुर्गम भागातील रस्त्यावरून ही बस जात होती. हा रस्ता रशियातील समराला जोडला जातो. तसेच येथून उझबेकिस्तानची सीमाही जवळ आहे. ही बस कोणत्या दिशेने जात होती हे स्पष्ट झालेले नाही. आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बसने अचानक पेट घेतल्यानंतर केवळ पाच प्रवासी बाहेर पडू शकले तर 52 जणांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली.

Web Title: kazakhstan bus accident

टॅग्स