खैबर क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर इराणचा इस्रायल, अमेरिकेला इशारा

Khaibar Buster Missile, Iran: इराणने लांब पल्ल्याचे नवीन क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
Khaibar Buster Missil launch Iran
Khaibar Buster Missil launch IranSakal

इराणने लांब पल्ल्याचे नवीन क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र इस्रायल (Iran Israel War) आणि या भागातील अमेरिकन लष्करी तळांना (US Iran Tension) लक्ष्य करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचे नाव खैबर बस्टर क्षेपणास्त्र (Khaibar Buster Missile) असल्याचे इराणच्या सरकारी मीडियाने सांगितले आहे.

'खैबर' हे इस्लामच्या सुरुवातीच्या काळात प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम योद्ध्यांनी ताब्यात घेतलेल्या ज्यू किल्ल्याचे नाव होते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1450 किमी आहे. क्षेपणास्त्राचे इंजिन घन इंधनावर चालते. हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्यास सक्षम असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हे जे क्षेपणास्त्र (Missile) कोणत्याही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला चकवा देऊ शकते. (Khaibar Buster Missile, Iran

Khaibar Buster Missil launch Iran
चीन-पाकवर 'प्रलय'चं सावट; भारताकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

इराणी लष्कराकडून क्षेपणास्त्राचे कौतुक-

इराणी सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बघेरी यांनी याचे वर्णन धोरणात्मक आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र असे केले आहे. ते म्हणाले की, इराणी प्रजासत्ताकच्या शत्रूंना बळाच्या भाषेशिवाय समजत नाही. इस्रायल (Israel) आणि अमेरिका (America) यांनी त्यांच्या मर्यादेतच राहावे, असे ते म्हणाले. इराणच्या लष्करप्रमुखांनी लाँचिंग गार्ड्स एअरफोर्स तळाच्या भेटीदरम्यान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचं लाँचिंग केलं. यावेळी इराणच्या एरोस्पेस विभागाचे प्रमुख मिराली हाजीजादेह उपस्थित होते.

Khaibar Buster Missil launch Iran
ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारावर भारत -फिलिपीन्सची स्वाक्षरी; चीनला झटका

2000 किमीपर्यंत मारा करण्याची इराणमध्ये ताकद-

इराणपासून इस्रायलचे (Israel) सर्वात जवळचे ठिकाण ९९७ किमी अंतरावर आहे. इराणकडे अशी अनेक क्षेपणास्त्रे आहेत, जी 2000 किमीपर्यंत मारा करू शकतात. मध्यपूर्वेतील देशांमध्ये इराणकडे सर्वाधिक क्षेपणास्त्रे आहेत. 24 डिसेंबर रोजी इराणने लष्करी सरावादरम्यान एकाच वेळी 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missile) डागून इस्रायलला आपली ताकद दाखवून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com