Khalistani : दहशत वाढली! खलिस्तानी समर्थकांचा भारतीय पत्रकारावर हल्ला; PM मोदींना घातल्या शिव्या

पंजाबमध्ये अमृतपाल सिंग (Amritpal Singh) विरोधात सुरू झालेल्या सर्च ऑपरेशननंतर जगभरात राहणारे खलिस्तान समर्थक दहशत माजवत आहेत.
Khalistan supporters attacked Indian journalist
Khalistan supporters attacked Indian journalistesakal
Summary

खलिस्तानी भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांना शिवीगाळ करण्यासोबतच दूतावासाची तोडफोड करत होते.

पंजाबमध्ये अमृतपाल सिंग (Amritpal Singh) विरोधात सुरू झालेल्या सर्च ऑपरेशननंतर जगभरात राहणारे खलिस्तान समर्थक दहशत माजवत आहेत. खलिस्तानींनी (Khalistani) अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि ब्रिटनमधील भारतीय दूतावासावरही हल्ले केले आहेत.

आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये खलिस्तान समर्थकांच्या रॅलीदरम्यान भारतीय पत्रकार ललित के झा (Indian Journalist Lalit K Jha) यांनी प्रश्न विचारला असता, खलिस्तानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. खलिस्तान समर्थकांनी पत्रकार आणि पीएम मोदींना शिवीगाळ केली. त्यानंतर बाचाबाची झाली. पत्रकारानं आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केलाय.

Khalistan supporters attacked Indian journalist
Dalai Lama : दलाई लामांचा चीनला मोठा धक्का; अवघ्या 8 वर्षांच्या मंगोलियन मुलाला बनवलं 'धर्मगुरु'

परदेशात भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार भारतीय दूतावासासमोर खलिस्तान समर्थकांच्या रॅलीचं कव्हरेज करत होते. दरम्यान, त्यांनी प्रश्न विचारले असता काही जणांनी कॅमेरा बंद करा, असं सांगण्यास सुरुवात केली. यानंतर ते कॅमेऱ्यासमोर आले आणि शिवीगाळ करू लागले. पत्रकारासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सध्या खलिस्तानी परदेशात भारताची बदनामी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Khalistan supporters attacked Indian journalist
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं सडेतोड उत्तर; रविशंकर म्हणाले, तुमच्यासाठी वेगळा कायदा..

खलिस्तानींनी पत्रकाराला केली मारहाण

पत्रकारासोबत 25 मार्च रोजी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी इथं खलिस्तानी समर्थक निदर्शनं करत होते. सुरक्षा पुरवल्याबद्दल भारतीय पत्रकारानं अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याचंही आभार मानले आहेत. खलिस्तानींनी त्यांच्या डाव्या कानावर दोन काठ्या मारल्याचं पत्रकाराचं म्हणणं आहे. यानंतर तिथल्या 911 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करण्यात आला आणि पोलिसांनी तात्काळ पोहोचून त्यांची सुटका केली.

Khalistan supporters attacked Indian journalist
Earthquake News : पाकिस्तान, अफगाणिस्ताननंतर भारतभूमी भूकंपानं हादरली; 'या' राज्यांत जोरदार धक्के

भारतीय दूतावासाची तोडफोड

खलिस्तानी दूतावासाबाहेर झेंडे फडकत होते. खलिस्तानी भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांना शिवीगाळ करण्यासोबतच दूतावासाची तोडफोड करत होते. हे हल्लेखोर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत शिवीगाळ करत होते. याशिवाय, मोदी सरकार आणि पंजाब पोलिसांवर निशाणा साधला जात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com