VIDEO : 'अल्लाहू अकबर' म्हणत सामान सोडून पळू लागला; एअरपोर्ट केलं रिकामं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

पकडला गेलेला हा व्यक्ती स्लोवेनियाचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.

फ्रँकफर्ट : जर्मनीच्या प्रसिद्ध फ्रँकफर्ट एअरपोर्टवर एक विचित्र घटना घडल्याची बातमी समोर आलीय. एका व्यक्तीने अल्लाहू अकबरचा नारा देत प्रवाशांना मारण्याची धमकी दिल्यानंतर उपस्थित प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. खरंतर चेहऱ्यावर मास्क न लावल्याबद्दल जेंव्हा पोलिसांनी एका व्यक्तीला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्या व्यक्तीने अल्लाहू अकबरची घोषणा दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतल्यानंतर तो व्यक्ती आपले सामान सोडून पळून जाऊ लागला. यानंतर पोलिसांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअरपोर्ट काही काळासाठी सील केले. पोलिसांनी लागलीच बंदुकीचा धाक दाखवत या व्यक्तीला अटक देखील केली आहे.  

पकडला गेलेला हा व्यक्ती स्लोवेनियाचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. हा व्यक्ती फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. मास्क न घातल्यामुळे जेंव्हा पोलिसांनी चौकशी करायच्या प्रयत्न केला तेंव्हा तो जोरजोरात ओरडू लागला. मी तुम्हा सर्वांना मारेन, अल्लाहू अकबर असं तो म्हणू लागला. एवढं म्हणून तो आपले सामान सोडून पळून जाऊ लागला. यानंतर या विमानतळाच्या टर्मिनल 1 ला रिकामं करण्यात आलं. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसून येतंय की, हातात बंदुक असणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला घेरलं आहे. या दरम्यान पोलिसांनी एअरपोर्टवरुन चालणाऱ्या रेल्वे सेवेला देखील स्थगित केलं.

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत नवे 15,144 रुग्ण; 181 रुग्णांचा मृत्यू​
स्लोवेनियाचा आहे आरोपी
पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, एका फेडरल पोलिसाने आपल्या गस्त दरम्यान एका स्लोवेनियाच्या एका व्यक्तीला मास्क न घातल्याबद्दल विचारणा केली. मात्र, त्याने अचानकच आक्रमकपणे मी तुम्हा सर्वांना मारेन, अल्लाहू अकबर अशी घोषणा केली. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पळून जायचा प्रयत्न केला. त्यानंतर, त्याच्या या प्रकारच्या वर्तनामुळे त्याला अटक करण्यात आली. सध्या या व्यक्तीची चौकशी केली जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kill you all aggressive man triggers blockade at Frankfurt airport