प्यॉंगयॉग : चार लाख नागरिक तापाने फणफणले

उत्तर कोरियात औषध पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांना फटकारले
 Kim Jong-un Four lakh people suffer from fever lack of supply of medicine  North Korea
Kim Jong-un Four lakh people suffer from fever lack of supply of medicine North KoreaSakal

प्यॉंगयॉग : उत्तर कोरियात कोरोनाचा प्रसार वाढत असून चोवीस तासांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३,९२,९२० जण तापेने फणफणले आहेत. अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशात औषध पुरवठ्यास होत असलेल्या विलंबावरून अधिकाऱ्यांना फटकारले. कोरोनाच्या जागतिक महासाथेला आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाय योजण्याचे आणि आरोग्य विभागाला मदत करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

उत्तर कोरियाच्या संसर्गविरोधी विभागाच्या मुख्यालयाने म्हटले की, एप्रिलच्या शेवटपासून ते आतापर्यंत १२ लाख लोकांना ताप आला आहे. त्यापैकी ५ लाख ६४ हजार ८६० जण आयसोलेशनमध्ये राहत आहेत. मृतांची संख्या आता ५० वर पोचली आहे.परंतु सरकारने अधिकृतरीत्या हा आकडा जाहीर केलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, आरोग्य व्यवस्था विस्कळित असून कोरोना संसर्गाला रोखण्यास अपयश आल्यास मोठे संकट उभे राहू शकते. तब्बल २.६ कोटी लोकसंख्येच्या देशातील बहुतांश जणांनी डोस घेतलेले नाहीत.

रुग्ण सापडताच आणीबाणी

उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात पहिला रुग्ण सापडताच आणीबाणी लागू केली होती. लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर ताप आलेल्या लोकांना आयसोलेट केले. २०२० रोजी जगभरात कोरोना पसरल्यानंतर उत्तर कोरियाने सीमा बंद केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com