बापरे! मास्क न घालणाऱ्यांना हुकूमशाहा किम जोंग उन देणार ही क्रूर शिक्षा

कार्तिक पुजारी
Thursday, 23 July 2020

जगभरात कोरोना महामारी थैमान घातल असताना उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनीही या विषाणूची धास्ती घेतल्याचं दिसत आहे

प्योंगयांग- जगभरात कोरोना महामारी थैमान घातल असताना उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनीही या विषाणूची धास्ती घेतल्याचं दिसत आहे. कोविड-१९ चे गांभीर्य लक्षात घेउन किम जोंग उन यांनी मास्क न वापरणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियातून येणाऱ्या बातम्यांनुसार, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना ३ महिने सश्रम तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

भारतात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासांत...
जगापासून वेगळं राहणाऱ्या उत्तर कोरियामध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला थांबवण्यासाठी हुकूमशाह किम जोंग उन कठोर पाऊल उचलत आहेत. रेडियो फ्री एशियाच्या माहितीनुसार, मास्क न वापरणाऱ्या लोकांची धर-पकड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा 'मास्क गट' तयार करण्यात आला आहे. हा 'मास्क गट' मास्क न वापरणाऱ्या लोकांचा शोध घेणार आहे. यावेळी जे लोक मास्क न वापरता हिंडताना दिसतील, अशा लोकांना तीन महिन्याच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे. मास्क गटासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना भरती केले जात आहे.

उत्तर कोरियात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पण याबाबतची आकडेवारी त्या देशाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. असे असले तरी किम जोंग उन यांच्याकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचं दिसत आहे. लोकांना एका ठिकाणी जमा होण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मास्क घालणे आणि सीमा भागात काम करणाऱ्या लोकांनी वेगवेगळे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, उत्तर कोरियाने असा दावा केला आहे की, त्यांच्या देशात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही.

भूकंपाने हादरला चीन; तीव्रताही मोठी
दरम्यान, जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय या विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १.५१ कोटीच्या पुढे गेली आहे, तर आतापर्यंत ६, २१,८०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १५,१६६,४०१ झाली आहे. अमेरिका जगात सर्वाधिक कोरोनाबाधित देश ठरला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३,९६७,९१७ कोरोनी विषाणूची प्रकरणे समोर आली आहे. १,४३,१४७ लोकांचा आतापर्यंत कोरोनाने जीव घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझिलचा दुसरा क्रमांक असून भारत तिसऱ्या स्थानी आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kim jong un north koriea dictetore disition about corona mask