esakal | किम जोंग उन यांना पुन्हा भेटण्याची इच्छा : ट्रम्प
sakal

बोलून बातमी शोधा

किम जोंग उन यांना पुन्हा भेटण्याची इच्छा : ट्रम्प

किम जोंग उन यांना पुन्हा भेटण्याची इच्छा : ट्रम्प

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांना पुन्हा भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची आपली इच्छा असल्याचे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केले. किम जोंग यांच्या बरोबरच्या चर्चेची लवकरच घोषणा केली जाईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

कोरियन द्वीपकल्पातील अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून उत्तर कोरियाने उचललेल्या पावलांचे स्वागत करत ट्रम्प यांनी किम जोंग यांचे त्यासाठी कौतुकही केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांच्यात चर्चा झाली. या वेळी ट्रम्प म्हणाले, की किम जोंग यांची मी लवकरच भेट घेणार आहे. या भेटीचे ठिकाण निश्‍चित झाल्यानंतर त्याची घोषण जाईल. 

ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात चालू वर्षी जूनमध्ये सिंगापुरात पहिल्यांदाच ऐतिहासिक चर्चा झाली होती. या चर्चेच्या वेळी उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याबाबत टप्प्याटप्प्यांत पावले उचलण्याबाबत एकमत झाले होते. 

loading image