स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे लखनौ कनेक्शन...

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

-  स्टीफन हॉकिंग ऑक्सफर्ड शाळेत जात होते तेव्हा त्यांचे वडील फ्रँक हॉकिंग लखनौ येथे संशोधन करत होते.

लखनौ : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आज (ता.8)  जयंती आहे. मूळचे इंग्लंडचे असलेल्या स्टीफन हॉकिंग यांचे लखनौसोबत संबंध राहिले होते. स्टीफन हॉकिंग ऑक्सफर्ड शाळेत जात होते तेव्हा त्यांचे वडील फ्रँक हॉकिंग लखनौ येथे संशोधन करत होते. त्यामुळे हॉकिंग आणि लखनौचे एकप्रकारचे नातेसंबंधच निर्माण झालेले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 मध्ये ऑक्सफर्ड येथे झाला होता. स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात मोठे योगदान दिले. ब्लॅक होल आणि बिग बँग थेअरीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. स्टीफन हे 9-10 वर्षांचे होते तेव्हा ते आपल्या वडिलांकडे राहत होते. हॉकिंग यांच्याबाबतची बरीच माहिती त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांनी आज सांगितली. 

Image result for stephen hawking

फ्रँक हॉकिंग मेडिकल रिसर्चचे प्रमुख

स्टीफन हॉकिंग यांचे वडील फ्रँक हॉकिंग हे इंग्लंडमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चचे प्रमुख होते. आई-वडिलांच्या मार्गदर्शनातच स्टीफन यांचे भौतिक विज्ञान या विषयाची आवड निर्माण झाली होती. 

21 व्या वर्षी आजाराचे निदान

स्टीफन हॉकिंग यांना मोटर न्यूरोन (शरीरातील नसांचे कार्य बिघडवते) या आजाराचे निदान झाले. तेव्हा डॉक्टरांनी स्टीफन हे दोन-तीन वर्षापर्यंत जगू शकतील, असे सांगितले होते. मात्र, स्टीफन हॉकिंग हे 76 वर्षे जगले.

Image result for stephen hawking

76 व्या वर्षी निधन 

स्टीफन यांनी संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. शारीरिक कमतरता असूनही त्यांनी परिस्थितीशी सामना केला. 4 मार्च 2018 ला वयाच्या 76 व्या वर्षी हॉकिंग स्टीफन यांचे निधन झाले. 

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about stephen hawking